क्रिकेटप्रेमींची निराशा! भारत विरुद्ध इंग्लंड वॉर्म-अप मॅच रद्द ? गुवाहटीतून बातमी आली समोर
गुवाहटी : (Ind Vs England Warm-Up Match Cancelled) पुढच्या आठवड्यापासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. त्याआधी भारत आणि इंग्लंडमध्ये आज 30 शनिवार सप्टेंबर रोजी पहिला सराव सामना होणार आहे. दोन्ही टीम्सचा हा पहिला आहे. इंग्लंड 5 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध आपला पहिला वर्ल्ड कप सामना खेळणार आहे. टीम इंडिया 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहे. वॉर्म-अप मॅचआधी गुवाहटीतून एक मोठी अपडेट समोर आलीय.
त्यामुळे क्रिकेट फॅन्सच मन मोडलं जाऊ शकतं. भारत आणि इंग्लंडमधील सराव सामना गुवाहटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. पण आज गुवाहटीमध्य पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी गुवाहटीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार नाणेफेक झाली की पावसाने हजेरी लागली. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सामन्याचा एकही चेंडू खेळण्यात आला नसल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. आयसीसी वर्ल्ड कप वॉर्म-अप मॅचच थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर होणार आहे.
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमच स्क्वॉड
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.