क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

पहिल्याच सामन्यात रचला विक्रम! जे धोनी-विराटला जमलं नाही, ते बुमराहनं करुन दाखवलं..

IND Vs IRE T-20 Series 1st Match : भारत अन् आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना काल शुक्रवार दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी खेळवण्यात आला. पावसाने खोडा घातल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार, जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयर्लंडला दोन धावांनी विजय मिळवत धुळ चारली. तब्बल वर्षभर झाले मैदानापासून दुर असलेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कर्णधारपद सांभाळल्यानंतर पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवणारा जसप्रीत बुमराह पहिला भारतीय खेळाडू आहे.

याआधी विरेंद्र सेहवाग, धोनी, विराट आणि रोहित शर्मा यांनाही हा कारनामा करता आला नव्हता. नेतृत्व सांभाळत पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा पराक्रम जसप्रीत बुमराहने केला आहे. बुमराह भारताचा अकरावा टी 20 कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. या सामन्यात बुमराहने भेदक मारा करत आयर्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडले होते. पहिल्याच षटकात बुमराहने दोन विकेट घेत भारताचे पारडे जड केले होते. बुमराहला या प्रभावी कामगिरीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

बुमराहने जवळपास वर्षभरानंतर भारतीय संघात कमबॅक केलेय. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या. आशिया चषक आणि विश्वचषकाआधी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होणं, भारतासाठी महत्वाचे होते. फिट झालेल्या बुमराहला आयर्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून पाठवण्यात आले. बुमराहने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बुमराहने पहिल्याच षटकात भेदक मारा करत सर्वांचं लक्ष वेधले. त्याने पहिल्या षटकात फक्त 4 धावा देत दोन विकेट घेतल्या. बुमराहने एंड्रयू बालबर्नी आणि लोरकन टकर यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे आयर्लंडचे आघाडीचे फलंदाज माघारी गेल्याने हा विजय मिळवण्यास टीम इंडियाला सोपे झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये