Top 5क्रीडा

सूर्या पुन्हा तळपला! तुफान शतकी खेळीने न्यूझीलंड संघासमोर १९२ धावांचं तगडं आव्हान

बे ओव्हल (IND VS NZ T20 Match) – टी २० वर्ल्ड कप २०२२ हातातून गेल्यानंतर भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी दिसून आली होती. मात्र, न्यूझीलंड विरुद्धची टी २० मालिका भारतीय संघाला आपली कामगिरी दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचा फायदा उचलत सुर्यकुमार यादवच्या धमाकेदार शतकी खेळीने भारतीय संघाने न्यूझीलंड समोर तब्बल १९२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरल्यानंतर सुरुवातीच्या काही षटकांमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली होती मात्र, रिषभ पंत बाद झाल्यानंतर मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या सुर्यकुमार यादवने आक्रमकपणे फटकेबाजी करत फक्त ४९ चेंडूंत तुफान शतकी खेळी खेळली.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत कर्णधार केन विल्यम्सनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुर्याकुमार यादव आणि इशांत किशन यांनी चांगली कामगिरी केली आहे. आता न्यूझीलंड संघ कशाप्रकारे हे आव्हान पेलू शकेल का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये