क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

न्यूझीलंडने चारली भारताला पराभवाची धूळ! टॉम लॅथमने नोंदवला ‘हा’ मोठा विक्रम…

ऑकलंड : (IND Vs NZ ODI Series 1st Match 2022) भारत आणि न्यूझीलंड ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका न्यूझीलंडमध्ये खेळवली जात आहे. या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाने न्यूझीलंडच्या संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यांनी ४८ षटके पूर्ण होण्याच्या आतच भारताने दिलेले ३०७ धावांचे आव्हान पूर्ण केले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि केन विलियम्स या जोडीने शानदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी बोलावले. भारताने प्रथम फलंदाजी करत 306 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, गोलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पराभवाला समोर जाव लागलं.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने शानदार शतक झळकावत आपल्या संघाची धावसंख्या गाठली आणि नवा विक्रमही केला. लॅथमने १०४ चेंडूत १४५ धावा केल्या. लॅथमने ७६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७वे शतक आहे आणि भारताविरुद्धच्या वनडेमध्ये न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. लॅथम आणि केन विल्यमसन यांच्यातील वनडेतील ही सर्वोच्च भागीदारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये