भविष्यवाणी खरी ठरली! अन् शोएब अख्तर पाकिस्तानानी फलंदाजीवर संतापला..
Ind vs Pak World Cup 2023 Shoaib Akhtar : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करत गुडघे टेकवले. भारताच्या पाचही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या आणि 42.5 षटकांत पाकिस्तानला 191 धावांवर सर्वबाद केले. आता पाकिस्तानची ही खराब फलंदाजी पाहून त्याचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच संतापलेला दिसला.
पाकिस्तानच्या खराब फलंदाजीमुळे माजी गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच दुखावल्या गेला. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो म्हणाला की, या सामन्याची खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट . आणि अब्दुल्ला शफीक, बाबर आणि इमाम यांनी चांगली सुरुवात केली, पण पाकिस्तानला ती सुरुवात पुढे नेता आली नाही. आमच्या संघात मोठ्या धावा काढण्याची प्रतिभा नव्हती, त्यामुळे संघाच्या या कामगिरीने मला दुखावले आहे.
शोएब अख्तरने फलंदाजांच्या कमतरतेबद्दल बोलताना म्हटले आहे की, या सपाट विकेटवर तुम्ही क्रॉस बॅटने का खेळता? पाकिस्तान ऑलआऊट होण्याच्या अर्धा तास आधी शोएबने हा व्हिडिओ अपलोड केला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले होते की, अशा कामगिरीनंतर मला नाही वाटत की पाकिस्तान 200 धावा करणे.
यावेळी शोएबने भारताचे कौतुक केले. तो म्हणाला की, टीम इंडियाने चांगले पुनरागमन केले आहे, रोहित शर्माचे कर्णधारपद उत्कृष्ट होते. त्याने आपल्या गोलंदाजांचा चांगला वापर केला.