क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

KL राहुलचे वाढले टेन्शन! वर्ल्ड कपसाठी इशान किशनची टीम इंडियात जागा पक्की?

(Ind Vs WI ODI Serial 2nd Match) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसोबतच भारतीय संघाने आगामी एकदिवसीय विश्वचषकाची तयारीही सुरू केली आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून कोणत्या खेळाडूचा समावेश करायचा हा संघासमोर सध्या मोठा पेच आहे. आता ही समस्या दूर होताना दिसत आहे, ज्यामध्ये इशान किशनने मागील काही डावांमध्ये बॅकअप सलामीवीर आणि यष्टीरक्षक म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे.

केएल राहुल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याचवेळी श्रेयस अय्यर अद्याप तंदुरुस्त नसल्यामुळे इशान किशनने मधल्या फळीत एक पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर इशानच्या बॅटने गेल्या 3 डावांमध्ये सलग अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये 1 कसोटीत तर 2 वनडेमध्ये झळकले आहेत.

एकदिवसीय मालिकेत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये इशानने स्वत:ला सिद्ध केले आणि 52 आणि 55 धावांची शानदार खेळी खेळली. गेल्या 1 वर्षात इशान किशनची कामगिरी सर्वात प्रभावी ठरली आहे. इशानने 584 धावांसह 6 अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत. त्यामुळे केएल राहुलची वर्ल्ड कपमधील जागा इशान किशान हिसकवणार असल्याचे अनेक क्रिकेटप्रेमींना वाटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये