दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी BCCIकडून संघाची घोषणा! कोणाला संधी, कोणाला डच्चू? वाचा सविस्तर
नवी दिल्ली : (India Squad For South Africa Tour) ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका संपल्यानंतर, डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे रोहित शर्मा केवळ कसोटी मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे.
गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे निवड समितीची बैठक झाली, ज्यामध्ये तिन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर करण्यात आला. रोहित शर्मा टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅटसाठी उपलब्ध असेल की नाही आणि तसे असल्यास तो टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व करत राहील का याकडे बहुतेकांचे लक्ष लागले होते. अलीकडील अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की पुढील वर्षी होणार्या टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रोहितला कर्णधारपदी कायम ठेवण्यासाठी बोर्ड पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तसे झाले नाही.
टी-20 भारतीय संघ :
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप सिंग, मोहम्मद यादव, अर्शराज यादव मुकेश कुमार, दीपक चहर.