क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

कांगारू पाॅवरफुल? 16 धावांवर टीम इंडीयाला 3 धक्के; आघाडीचे फलंदाज पव्हेलियनमध्ये!

मुंबई : (India vs Australia 1st ODI) प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 129 अशी होती, त्यानंतर संघात 59 धावा करताना आठ विकेट गमावल्या. चांगल्या स्थितीत वाटत असणारी कांगारूंची सर्व टीम 189 गारद झाली.

दरम्यान, 189 धावांचा पाठलाग करण्याठी मैदानात उतरलेली टीम इंडिया पाॅवर प्ले सफसेल फेल ठरली आहे. आवघ्या तीन धावांवर कागांरूनी भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर स्कोर बोर्ड 16 धावा असताना भारताला एकापाठोपाठ दोन धक्के बसले. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली 9 चेंडूत 4 धावा करुन पव्हेलियमध्ये परतला. त्यानंतर भोपळाही न फोडता सुर्यकुमार बाद झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेचा थरार आजपासून सुरु झाला. पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये