Ind Vs Aus : कांगारूंचा करिष्मा! भारताचा लाजिरवाणा पराभव
विशाखापट्टणम : (India vs Australia 2nd ODI) तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. कांगारूंच्या आघाडीच्या फंलदाजांनी भारताच्या गोलंदाजांना धू धू धूतलं आहे. हेडनं नाबाद 51 तर मार्शनं नाबाद 66 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताचा कांगारूनी (IND vs AUS) आजच्या सामन्यात दणदणीत पराभव झाला.
टीम इंडियाचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता मात्र, कांगारूंनी याच्यावर विरझण घालण्याच काम केलं आहे. पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज विशाखापट्टणम येथे दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाशी भिडला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर शरणागती पत्कारत आवघ्या 118 धावांवर गुडघे टेकल्याची पाहायला मिळाले.