क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

टीम इंडियाला तीन षटकांत दोन धक्के! यशस्वीनंतर इशान किशन शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये

India vs Australia 3rd T20 : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करणार आहे तर दुसऱ्या बाजूला दोन पराभवाचा वचपा काढण्याचा कांगारूंचा प्लॅन असणार आहे.

फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला डावाच्या दुसऱ्याच षटकात १४ धावांवर यशस्वी जैसवालच्या रुपाने मोठा धक्का बसला. जेसन बेहरेनडॉर्फचा त्याला बाद केले. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 18 धावा आहे.

तिसऱ्या षटकात 24 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. केन रिचर्डसनने इशान किशनला झेलबाद केले. पाच चेंडू खेळणाऱ्या इशानला खातेही उघडता आले नाही. तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा आहे.

तिसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11 मध्ये तीन बदल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये