ऑस्ट्रेलियाची सामन्यापूर्वी मोठी घोषणा! दोन पराभवानंतर कांगारूंनी निम्मा संघ बदलला..
India vs Australia T20 Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दोन सामने खेळल्या गेले आहेत. हे दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. यासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
मालिकेतील तिसरा सामना आज (28 नोव्हेंबर) गुवाहाटीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. मालिकेत तीन सामने बाकी आहेत, मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल झाला आहे. सलग दोन पराभवानंतर कांगारूंनी अर्धा संघ बदलला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग असलेले स्टीव्ह स्मिथ आणि अॅडम झाम्पा तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी मायदेशी परतले आहेत. ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि शॉन अॅबॉट हे तिघेही उद्या ऑस्ट्रेलियाला परततील, असेही अहवालात म्हटले आहे. अशाप्रकारे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेच्या मधीच ऑस्ट्रेलियाचे 6 खेळाडू वगळण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियन संघातील बदलांनंतर, विश्वचषक विजेत्या संघातून सध्याच्या संघात फक्त ट्रॅव्हिस हेड उरला आहे, जो भारतातच राहणार आहे. त्याने वर्ल्ड कपच्या अंतिम आणि उपांत्य फेरीत हेडने चमकदार कामगिरी केली होती. फायनलमध्येही त्याने भारताविरुद्ध शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. पण ऑस्ट्रेलियन संघ टी-20 मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ –
मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.