टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर किंग कोहली ‘क्लीन बोल्ड’
अहमदाबाद : (India vs Australia World Cup 2023 Final) विराट कोहली 29 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधर पॅट कमिन्सने त्याला क्लीन बोल्ड केले. त्यामुळे हा टीम इंडियासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विश्वचषकात फाॅर्मात असलेल्या किंग कोहलीला बाद केल्यानंतर कांगारूंचा आनंद नक्कीच द्विगुणीत झाला असेल.
कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारत, अंतिम फेरीत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वनडेतील 72 वे अर्धशतक आहे. विराटने सलग पाचव्या डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने ही कामगिरी केली होती.
भारताचा धावांचा वेग थोडा मंदावला आहे. 34 षटकानंतर भारताची 165 4 बाद अशी स्थिती आहे. केएल राहुल 47 धावांवर तर कोहली बाद झाल्यानंतर आलेला रविंद्र जडेजा 6 धावांवर नाबाद खेळत आहेत.