क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश
ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा, टीम इंडियाचा प्रथमच डाव आटोपला सारा! कांगारूना 241 धावांचे आव्हान
अहमदाबाद : (India vs Australia World Cup 2023 Final) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला आहे. कांगारू संघाने विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले.
या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.