क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश
नरेंद्र मोदी मैदानावर सन्नाटा! ‘हिटमॅन’ शर्मानंतर कांगारूंनी अय्यरला दाखवला पवेलियनचा रस्ता
अहमदाबाद : (India vs Australia World Cup 2023 Final) शुभमन गिल बाद झाल्याची जखम ताजी असतानाच टीम इंडियाला एकापाठोपाठ दोन धक्के बसले आहेत. कर्णधार रोहित 47 धावांवर बाद झाल्यानंतर हा घाव पचतो न पचतो तोच कांगारूंनी श्रेयस अय्यरच्या रुपाने तिसरा धक्का दिला. त्यामुळे नरेंद्र मोदी मैदानावर एकदम सन्नाटा पाहायला मिळत आहेत.
रोहित शर्माने 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 31 चेंडूत 47 धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यर 4 धावांवर बाद झाला.
सध्या विराट कोहली आणि केएल राहुल मैदानावर नाबाद खेळत आहेत. विराट 30 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावांवर तर राहुल 14 चेंडूत 7 धावांवर खेळत आहेत.