क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश
रोहित-विराटची आक्रमक फलंदाजी! षटकार-चौकारांचा पाऊस अन्..
अहमदाबाद : (India vs Australia World Cup Final 2023) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल क्रीजवर आहे. मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माविरुद्ध अपील केले. मात्र, पंचांनी त्याचे अपील फेटाळून लावले.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा अन् विराट कोहली यांनी आक्रमक रुप धारण करत कांगारूंच्या गोलंदाजांवर तुटून पडले आहेत. अवघ्या काही षटकांत 51 धावा रचल्या आहेत.
यामध्ये षटकार अन् चौकारांचा मोठा समावेश आहे. मात्र, या धावाच्या बदल्यात टीम इंडियाला शुभमन गिलची 4 धावांवर विकेट गमवावी लागली. रोहित शर्माने 27 चेंडूत 3 चौकर आणि 2 षटकारांच्या मदतीने 37 रचल्या आहेत. तर विराटने 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या आहेत. दोघही चांगल्या फाॅर्मात दिसत आहेत.