IND Vs BAN : आशिया कपमधील पराभवाचा बदला घेणार का पुनरावृत्ती होणार? पुण्यात रंगणार मुकाबला
पुणे : (India vs Bangladesh, World Cup 2023) यंदा यजमानपद भारताकडे असल्याने विश्वचषक स्पर्धा (World Cup 2023) काही वेगळीच वाटत आहे. टीम इंडियाने स्पर्धेतील तीन सामने खेळले असून त्यामध्ये विजयी हॅड्रीक केली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला आहे. भारताचा 19 ऑक्टोबर रोजी (Team India) आगामी सामना बांगलादेश (IND vs BAN) विरुद्ध पुण्यात रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल झाली आहे. यावेळी खेळाडूंना पाहण्यासाठी पुणेकरांना विमानतळावर तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
भारताचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. हा सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. आता पुढचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम (Maharashtra Cricket Association Stadium) वर दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
भारत आणि बांगलादेश यांच्यात यावर्षी फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. आशिया कप 2023 मध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना 265 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 259 धावांवर भारतीय संघाचा डाव आटोपला.