क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

Ind Vs Ing 2nd ODI: भारतीय बॉलर्सचा दबदबा कायम; बुमराह नंतर चहलची हवा!

भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा एक दिवसीय सामना सुरु आहे. मंगळवारी पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडचे नाकेनऊ आणले होते. बुमराहने तब्बल ६ विकेट घेत भारतीय संघातील ऐतिहासिक रेकोर्ड बनवला. भारताच्या गोलंदाजांनी ११० धावांवर इंग्लंड संघाला त्यांच्या तंबूत पाठवले होते. त्यानंतर भारतीय संघाची फलंदाजीही जबरदस्त राहिली होती रोहित शर्माने फिफ्टी करत शिखर धवनसोबत ११० धावांचं लक्ष साधलं होतं

आजच्या डावात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या काही ओवर मध्ये चांगली कामगिरी दाखवली मात्र हार्दिक पांड्याच्या ओवर मध्ये जशन रॉय बाध झाला त्यानंतर इंग्लंडचा डाव कोणत्याही फलंदाजाला सांभाळता आला नाही. युजवेंद्र चहलच्या फिरकी गोलंदाजीवर टप्प्याटप्प्यानं तीन फलंदाज बाध झाले आणि तिथेच इंग्लंडचा आत्मविश्वास ढासळला आणि धावसंख्या कमी झाली.

चहलने आजच्या सामन्यात चार विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. इंग्लंडचा डाव ढासळत असताना मोईन ली आणि डेविड विले यांनी प्रत्येकी ४७ आणि ४१ धावा घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र २४६ धावांवरच इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी रोखले.

आता भारतीय संघाची फलंदाजी सुरु झालेली आहे. आणि २४७ धावांचं लक्ष भारतीय संघासमोर आहे. मागील सामन्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला बाजी मारता येईल की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये