बुमराह-शामीने केला इंग्रजांचा पळता भुई! 15 षटकांत 52 धावांवर इंग्लंडचा निम्मा संघ खल्लास..
लखनऊ : (India vs England World Cup 2023) जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये भारताला यश मिळवून दिले. त्याने डेव्हिड मलानला 16 धावांवर बाद केले. अन् पुढच्याच चेंडूवर जो रूटला देखील पायचीत बाद करत सलग दुसरी विकेट घेतली.
जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पाठोपाठ दोन धक्के दिल्यानंतर मोहम्मद शामीने देखील इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने बेन स्टोक्सला शुन्यावर बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले.
मोहम्मद शामीने सलामीवीर जॉनी बेअरस्टोचा 14 धावांवर त्रिफळा उडवत इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 4 बाद 39 धावा अशी झाली.
कुलदीप यादवने कर्णधार जॉस बटलरचा 10 धावावर त्रिफळा उडवत इंग्लंडची अवस्था 5 बाद 52 धावा अशी केली.
भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये आज पहिल्यांदाच दुपारी फलंदाजी करत होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी भारताला 50 षटकात 9 बाद 229 धावात रोखले.