क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

टीम इंडियातून ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर! निवडकर्त्यांच्या एका निर्णयाने संपले करिअर

India vs Ireland T20 Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी 28 वर्षीय खेळाडूचा संघात समावेश केलेला नाही. या खेळाडूने मागील आयर्लंड दौऱ्यावर शानदार शतक झळकावले होते.

अष्टपैलू दीपक हुड्डाचा आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी नुकत्याच निवडलेल्या टीम इंडियामध्ये दीपक हुड्डाला स्थान मिळू शकले नाही. खराब कामगिरीमुळे टी-20 संघातून बाहेर पडला होता आणि आता पुनरागमन अवघड झाले आहे.

दीपक हुड्डा शेवटचा सामना फेब्रुवारी 2023 मध्ये अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याच वेळी त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर 2022 मध्ये शेवटचा वनडे खेळला होता.

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप. सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये