भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार क्रिकेटचा सामना! BCCI ने केली टीम इंडियाच्या शेड्यूलची घोषणा
India vs Pakistan in U-19 Asia Cup : अलीकडेच 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ मैदानावर आमनेसामने येणार आहेत. मात्र यावेळी हा सामना सिनियर नसून ज्युनियर संघांमध्ये होणार आहे.
टीम इंडियाचा ज्युनियर अंडर-19 संघ 8 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान आशिया कप खेळणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. बीसीसीआयने त्यासाठी संघाची घोषणा करताना, संपूर्ण वेळापत्रकही शेअर केले आहे.
आठ वेळचा चॅम्पियन भारतीय संघ या स्पर्धेत फेव्हरिट असणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, यूएई, जपान, श्रीलंका आणि बांगलादेश हे देशही सहभागी होणार आहेत.
टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक
8 डिसेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
10 डिसेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
12 डिसेंबर – भारत विरुद्ध नेपाळ
15 डिसेंबर – दोन्ही उपांत्य फेरीचे सामने
17 डिसेंबर – अंतिम सामना