अर्शदीपच्या पहिल्याच चेंडूत पाकिस्तानचा पाया खचला! ‘आझम-ए-टी 20’ शुन्यावर माघारी!

मेलबर्न : (India vs Pakistan T20 World Cup Match) भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात फक्त 1 धाव देत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या अर्शदीप सिंगच्या पहिल्याच चेंडूत पाकिस्तानचा पाया खचला! ‘आझम-ए-टी 20’ शुन्यावर माघारी गेल्यामुळे संघाचा आत्मविश्वास ढासळला.

दरम्यान, अर्शदीप सिंगने (Arshdeep) आपल्या करिअर चा विश्वचशकातील पहिल्याच चेंडूवर टी 20 किंग समजला जाणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) शुन्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था 1 बाद 1 धाव अशी झाली आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेला भारत-पाक (India vs Pakistan) हायव्होलटेज सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर रंगत आहे. आशिया कपमध्ये पाकिस्ताकडून भारतीय संघाला दोन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघावर आशिया कपमधून बाहेर पडण्याची नामुस्की ओढावली. मात्र याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय संघाला टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) चालून आली आहे.

Prakash Harale: