World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली; ‘या’ तारखेला होणार सामना
India Vs Pakistan World Cup 2023 Date : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा आधी 15 ऑक्टोबरला होणार होता. मात्र बीसीसीआयने सुरक्षा एजन्सीच्या विनंतीनुसार या सामन्याची तारीख बदलली आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात बीसीसीआयने (BCCI) वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा 15 ऑक्टोबर घटस्ठापनेदिवशीच होणार होता. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
मात्र बीसीसीआयला सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली होती. बीसीसीआयने देखील या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित बैठक घेतली होती. या बैठकीतच सामन्याची तारीख बदलण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. जरी भारत – पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात येणार असली तरी सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.