पाकिस्तानला दुसरा धक्का! हार्दिक पांड्याची जादू, इमाम उल हक केलं काबू..
India Vs Pakistan World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 चा सर्वात हाय व्होल्टेज सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. भारत – पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत.
सिराजने डावाच्या आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अब्दुल्ला शफिकला बाद करुन पाकिस्तानला पहिला धक्का दिला. शफिकला त्याचा चेंडू लेग साइडने खेळायचा होता, पण तो चुकला. चेंडू थेट त्याच्या पॅडवर लागला. 24 चेंडूत 20 धावा करून तो बाद झाला. शफीकने इमाम उल हकसह पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. .
पाकिस्तानची दुसरी विकेट पडली आहे. हार्दिक पांड्याने 13व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीर इमाम हकला बाद केले. इमाम 38 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. पाकिस्तानची धावसंख्या 13 षटकात 2 बाद 74 धावा आहे. बाबर आझम 16 धावांवर तर मोहम्मद रिझवान एका धावेवर नाबाद आहे.