क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

टीम इंडियाची धमाकेबाज गोलंदाजी; द. आफ्रिकेचे फलंदाज गारद, 61 धावांवर 6 बाद!

India vs South Africa 1st T20I Match 2022 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार टेंबा बावुमाला क्लीन बोल्ड केले. दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेला एकामागे एक तीन धक्के दिले. त्यामुळे द. आफ्रिकाची दोन षटकांनंतर चार बाद आणि आठ धावा अशी होती.

दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या षटकात पाचवा धक्का बसला. दीपक चहरने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्रिस्टन स्टब्सला अर्शदीप सिंगकडे झेलबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या चार खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. आठव्या षटकात हर्षल पटेलने एडन मार्करामला बाद केलं. त्यानं 24 चेंडूत 25 धावा केल्या तेराव्या षटकांनंतर दक्षिण आफ्रिका 6 बाद 61 धावा आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने भारतात अद्याप एकही टी-20 मालिका गमावलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये