क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी का निवडली? रोहित शर्माने सांगितलं मोठं कारण

कोलकाता : (India Vs South Africa World Cup 2023) विश्वचषक २०२३ मधील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या दोन्ही संघांमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये मोठा सामना आज ५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ पॉईंट्स टेबलमध्ये टॉपला राहण्यासाठी विजय मिळतील. भारतीय संघ सध्या १४ गुणांसह आणि एकही सामना न गमावता पहिल्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ गुणांसह आणि एका पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांमधील आज जो संघ सामना जिंकेल तो पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर जाईल.

भारतीय संघ सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे भारतीय संघात कोणते बदल होणार का आणि झाल्यास कोणाला सनदी मिळणार आणि कोणाला विश्रांती देण्यार याकडे सर्वांच्या नजर लागलाय होत्या. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे विश्वचषक संघातून बाहेर पडला आहे, त्यामुळे आता संघात नेमके कोणते बदल होणार, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याची नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. चांगली खेळपट्टी दिसते, खेळपट्टीशी तसा फारसा संबंध नाही, आम्हाला स्वतःला आव्हान द्यायचे होते. हा एक चांगला सामना असेल, दोन संघ ज्यांनी सातत्यपूर्ण क्रिकेट खेळले आहे आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, हा सामना जिंकून शीर्षस्थानी जाणे चांगले असेल. मला इथे खेळायला आवडते, फक्त मीच नाही तर संपूर्ण संघ या ऐतिहासिक मैदानावर खेळण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही एकच संघ खेळत आहोत, आम्ही ज्या पद्धतीने खेळत आहोत त्यात आम्हाला काहीही बदलण्याची गरज नाही.” अशारितीने या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये