क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारताला नमविणे सोपे! SA च्या मॅचविनरने सांगितला विजयाचा फॉर्म्युला; म्हणाला, “यापूर्वी आम्ही…”

India vs South Africa World Cup 2023 : भारतीय संघ सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. पण आता भारताचा सामना होणार आहे तो दक्षिण आफ्रिकेशी. पण हा सामना होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या मॅचविनर खेळाडूने आता भारतीय संघाला चॅलेंज दिले आहे. भारताला हरवणे अवघड नाही, असे म्हणत या मॅचविनर खेळाडूने विजयाचा फॉर्म्युला यावेळी सांगितला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रविवारी ५ नोव्हेंबरला होणार आहे.

“दडपणाचा व्यवस्थित सामना केला, तर भारताला भारतात नमविणे अवघड नाही. यापूर्वी आम्ही भारतीय संघाला भारतात नमविले आहे. वर्ल्ड कपची लढत जरी असली, तरी त्याचे दडपण आम्ही घेणार नाही,” असे स्पष्ट मत दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज रासी व्हॅन डेर डुसेनने व्यक्त केली. यासह त्याने भारताला आव्हानच दिले. कारण, या वर्ल्ड कपमध्ये भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. भारताची पुढील लढत पाच नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने पुण्यातील लढतीत न्यूझीलंडला १९० धावांनी सहज पराभूत केले. यात डुसेनने शानदार शतक ठोकले. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला संधीच दिली नाही. आता दक्षिण आफ्रिका संघ भारताचा विजयरथ रोखून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना डुसेन म्हणाला, ‘भारतात भारताविरुद्ध खेळणे सोपे नाही.

सध्या भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. भारतीय संघात सध्या तरी कुठलीच उणीव नाही. त्यांच्याकडे अफलातून गोलंदाज आहेत. अर्थात, त्या संघाची फलंदाजीही जबरदस्त आहे; पण तरीही त्या संघाविरुद्ध आम्ही चांगला खेळ केला, तर निश्चित वर्चस्व गाजवू. आव्हान केवळ दबावाचे आहे. दबाव हाताळण्यात यशस्वी ठरलो, तर भारताला भारतात हरविणे अवघड नाही. आम्ही यापूर्वी त्या संघाला नमविले आहे.’ वर्ल्ड कपची लढत आणि इतर लढत यात फारसा फरक डुसेनला जाणवत नाही. लढत वर्ल्ड कपची असल्याने अतिरिक्त दडपण घेण्याची त्याला गरज वाटत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये