श्रीलंकेने नाणेफेक जिंकली! टिम इंडिया नव्या वर्षाच्या सुरुवातीचा सामना जिंकणार का?

मुंबई : (India vs Sri Lanka T20 Serial 1st Match 2023) भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळत आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत दुखापतच्या कारणास्तव खेळू शकणार नाही. अशात हार्दिक पांड्या संघाच्या कर्णधाराची जबाबदारी पार पाडणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा ब्रिगेड श्रीलंकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असेल. सूर्यकुमार यादव या मालिकेत उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
आशिया चषक २०२२ मध्ये भारत आणि श्रीलंका शेवटचे आमनेसामने आले होते. त्यानंतर सुपर-१२ फेरीत श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव करून मोठा धक्का दिला. त्या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकला नाही. यानंतर श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. श्रीलंकेची टी-२० विश्वचषकात समान कामगिरी नसली तरी उपांत्य फेरीतही स्थान मिळवता आले नाही.
शुभमन गिल आणि शिवम मावी ने केले टी-२० मध्ये पदार्पण केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याआधी त्यांना हार्दिक पांड्याने कॅप दिली. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव उपकर्णधार असणार आहे. भारताचा ‘द-स्काय’ आणि ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणारा सूर्या मागील वर्ष स्वप्नवत म्हणावे तसे गेले. सर्वात जास्त धावा करणारा टी-२० मधील तो फलंदाज ठरला. २०२३ येत्या वर्षात तो कशी कामगिरी करणार याकडे सर्व चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.