पाॅवर प्लेमध्ये श्रीलंकेची ‘तुफानी’ खेळी, भारतीय गोलंदाजांची धू-धू धूलाई! शुन्य बाद 55 धावा…

मुंबई : (India vs Sri Lanka T20I series 2nd Match 2023) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात एक बदल आहे. जखमी संजू सॅमसनऐवजी राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात हर्षल पटेलच्या जागेवर आलेल्या अर्शदीप सिंगने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात सलग 3 नो बॉल टाकले. त्यातील दोन चेंडूवर तर षटकार आणि चौकार देखील लगावण्यात आले. त्याने दुसऱ्या षटकात तब्बल 19 धावा दिल्या. त्यानंतर कुशल मेंडिसने भारतीय गोलंदाजांची धू-धू धूलाई करत आवघ्या 27 चेंडूमध्ये अर्ध शतक पुर्ण केलं. पाॅवर प्लेमध्ये श्रीलंकेने 55 धावांवर शुन्य बाद अशी परिस्थिती आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील पहिला सामना भारताने अवघ्या 2 धावांनी जिंकत मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली.