आख्खा पाकिस्तान भारताच्या बाजूने उभा, टीम इंडियाच्या विजयासाठी ‘देव पाण्यात’!
मुंबई : (India vs Sri Lanka World Cup 2023) भारतीय संघ उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे. वानखेडेच्या मैदानात टीम इंडियाने आज विजय मिळवल्यास सेमीफायनलचे तिकिट मिळणार आहे. भारताच्या विजयासाठी पाकिस्तान क्रिकेट चाहतेही आतुर असतील. आज अख्खा पाकिस्तान भारतीय संघाला सपोर्ट करताना दिसेल. सोशल मीडियावरही अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी ट्वीट केले आहे.
पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारतीय संघाला सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे भारताच्या विजयासाठी पाकिस्तानच्या चाहत्यांचा सपोर्ट असेल. त्यासाठी पाकिस्तानच्या चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी देव पाण्यात ठेवल्याचे म्हटले जातेय.
वानखेडे स्टेडियमवर आज भारताने श्रीलंकेचा पराभव केला, तर पाकिस्तानचे सेमीफायनलचे आव्हान जिवंत राहणार आहे. आज भारताविरोधात श्रीलंकेचा पराभव झाल्यास त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे भारताच्या विजयासाठी पाकिस्तानचे देव पाण्यात आहेत. वानखेडेवर आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे.