क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

मुंबईत तीन दिवसात इंग्लंडचा खेळ खल्लास! 100 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला चमत्कार

India Women vs England Women Test : दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने एकमेव महिला क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडवर मोठा विजय नोंदवला. यजमान भारतीय संघाने दिलेल्या डोंगरासारख्या लक्ष्यासमोर पाहुण्या संघाने शरणागती पत्करली.

India vs England 2

दीप्ती शर्माच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंड सहज अडकले गेली. आणि मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच 347 धावांनी विजय मिळवला. यासोबत हा सामना जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. इतिहासात त्यांनी पहिल्यांदाच इंग्लंडला भारतात कसोटीत पराभूत केले.

India vs England 4

याआधी दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाला होता. कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने त्या पराभवाचा हिशेब बरोबरीत ठेवला. महिला क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे.

India vs England 3

भारताने पहिल्या डावात 428 धावा केल्या होत्या. नवोदित शुभा साथिसने 69 धावांची खेळी खेळली तर दीप्ती शर्माने 67 धावांचे योगदान दिले. विकेटकीपर यास्तिका भाटिया 66 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 49 धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्ज 99 चेंडूत 67 धावा करून बाद झाली.

India vs England 1

प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 136 धावा केल्या. पाहुण्या संघाकडून नॅट शीवरने सर्वाधिक 59 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने पहिल्या डावात 5 बळी घेतले. टीम इंडियाने आपला दुसरा डाव 6 गडी बाद 186 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात भारताकडे 292 धावांची आघाडी होती. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 479 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात 131 धावांत गारद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने चार आणि पूजा वस्त्राकरने तीन बळी घेतले. राजेश्वरी गायकवाडने दोन तर रेणुका सिंह ठाकूरने एक विकेट घेतली.

India vs England 5

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने या विजयासह मोठा विश्वविक्रम केला. महिला क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 1998 मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध 309 धावांनी विजय मिळवला होता, जो महिला क्रिकेटमधील आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय होता. या यादीत न्यूझीलंडची आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये