Top 5क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘या’ दोन खेळाडूंच्या अर्धशतकांमुळे भारताची दक्षिण आफ्रिकेवर आठ विकेट्स ने मात

नवी दिल्ली INDIAvsSOUTHAFRICAT20I : भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका T20I च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने आफ्रीकनांना धूळ चारली आहे. एकदम जबरदस्त गोलंदाजी करत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला १०६ धावांवरच ८ बाद घेत चीत केले होते. भारताच्या के एल राहुल आणि सुर्याकुमार यादव यांच्या अर्धशतकी खेळीने भारतीय संघाने १०७ धावांचा पाठलाग करत सहज यश मिळवलं. (INDIA WON BY 8 VICKETS WITH K L RAHUL AND SURYAKUMAR YADAVS HALF CENTURY)

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजला सोडता इतर खेळाडूंना भारतीय गोलंदाजांनी जास्त वेळ मैदानावर टिकून दिले नाही. मोठ्या कसरतीने महाराज ४१ धावा घेण्यास यशस्वी झाला. महाराज पाठोपाठ आयडेन मारक्रमने २५ तर वेन पार्नेल २४ धावा काढून मैदानाबाहेर पडले.

भारतीय संघाचं सांगायचं झाल तर कप्तान रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूत एकही धाव न घेता बाद झाला. किंग कोहलीची देखील तीच गत झाली होती. नऊ चेंडूत फक्त ३ धावा घेत त्यालाही समाधान मानावं लागलं. आजच्या सामन्यात के एल राहुल आणि सुर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेला गुध्के टेकायला लावले. के एल राहुलने ५६ चेंडूंत ५१ धावा घेतल्या तर सुर्याकुमारने फक्त ३३ चेंडूंत ५० धावा झोडल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये