मुंबई – INDvSA T-20 | भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी- 20 च्या पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यामध्ये भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आज तिसऱ्या सामन्यातही भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 180 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
मालिका वाचवायची असेल तर आता भारतीय गोलंदाजांकडून सर्वांना अपेक्षा आहेत. भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरूवात जोरदार केली. पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये भारतीय संघाने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. सलामीवीर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड तुफान फटकेबाजी केली.
दरम्यान, किशन आणि गायकवाडने अर्धशतके केलीत मात्र इतर फलंदाजांना फारशी काही चमक दाखवत आली नाही. आता भारतीय गोलंदाज आफ्रिकेला रोखतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.