क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

सिराजचा विकेट्सचा षटकार! भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेचं लोटांगण

Inida Vs Sri Lanka Asia Cup 2023 Final : आशिया कप 2023 चा सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात श्रीलंकेला मोठा धक्का दिला. त्याने तिसऱ्या चेंडूूवर कुसल परेराला शुन्यावर बाद केले.

मोहम्मद सिराजने सामन्याच्या चौथ्या षटकात लंकेची पार दैना उडवून दिली. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निसंकाला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा आणि चौथ्या चेंडूवर असलंकाला बाद केले. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिराजने धनंजयाला पॅव्हेलियनमध्ये पाठवत लंकेची अवस्था 5 बाद 12 अशी केली.

त्यानंतर सिराजने आपल्या तिसऱ्या षटकात देखील दसुन शनकाला शुन्यावर बाद करत आपली पाचवी विकेट टिपली. तर सहाव्या षटकात कुशल मेंडीसला रस्ता दाखवत विकट्सचा षटकार रजला असून लंकेने मोहम्मद सिराजपुढे लोटांगण घेतल्याचं दिसून आलं.

दरम्यान, सध्या लंकेची 13 षटकांत 40 धावांवर 8 बाद अशी स्थिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये