देश - विदेश

महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्याचा वाद चिघळला! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; पहा व्हिडीओ

पुणे : (Ink was thrown on Chandrakant Patil) महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी पैठणमध्ये केलं होतं. थोर महापुरुषांबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. चिंचवड गावांमध्ये चंद्रकांत पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता त्यांच्यावर हा शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. शाई फेक करणाऱ्या व्यक्तीचे अद्याप नाव आणि तो कोणत्या पक्ष किंवा संघटनेचा आहे याची माहिती समोर आली नाही.

चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चौक पोलीस बंदोबस्त असूनही काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला केला आहे. चंद्रकांत पाटील हे आज चिंचवड गावात मोरया गोसावी महोत्सवासाठी हजर झाले आहेत त्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला झाला. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक हल्ला झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये