पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

प्रकाश कदम यांच्याकडून विकासकामांची पाहणी

कात्रज : विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या लेकटाऊन येथील पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच संबंधित ठेकेदाराला काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्या. लेकटाऊन येथील ओढ्यावरील या पुलाच्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याने या कामाच्या प्रगतीचा पाठपुरावा सर्व कदम कुटुंबीयांच्या वतीने सातत्याने होत आहे. कालच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने दोन दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचा शब्द संबंधित ठेकेदाराने यावेळी दिला.

एकीकडे लेकटाऊन येथील हा पूल पूर्णत्वाकडे आणला असताना, कात्रज-कोंढवा रस्त्यावर राजस सोसायटी चौक येथे मी नियोजन करून सुरू केलेल्या कल्व्हर्टच्या कामाला आधी ठेकेदारांमुळे आणि नंतर पावसामुळे दिरंगाई झाली असून, हे कामदेखील संथ गतीने सुरू आहे. सध्यातरी पावसाने उघडीप दिली असल्याने राजस सोसायटी चौक येथील रस्त्याचे कामही ठरल्याप्रमाणे पूर्ण करणार. या कल्व्हर्टची रुंदी व उंची वाढवली असल्याने तलावातून ओव्हर फ्लो पाणी नाल्याने लेकटाऊन येथील नाल्याला कोणताही अडथळा न येता
जाऊन मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये