पुणेसिटी अपडेट्स

‘जलशक्ती अभियान’अंतर्गत कामांची पाहणी

पुणे ः ’जलशक्ती अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांची केंद्रीय पथकाने क्षेत्रीय भेटी देवून पाहणी केली. यावेळी अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे कौतुक केले.
केंद्रीय पथकाने ‘कॅच द रेन’ अंतर्गत जिल्ह्यातील झालेल्या कामांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या संचालिका स्मिता श्रीवास्तव, केंद्रीय जल, ऊर्जा व संशोधन संस्थेचे वैज्ञानिक सरबजीत सिंग, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, रोहयो उपजिल्हाधिकारी वनशी लाभशेटवार तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने शिरूर व खेड तालुक्यातील मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचा बंधारे, सिमेंट नाला बंधारे तसेच मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. खेड येथील वनविभागाच्या नर्सरीला भेट देऊन येथील कामांची पाहणी केली. शिरूर नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भेट देऊन ही संपूर्ण इमारत सौरऊर्जेवर कार्यान्वित असल्याबद्दल, तसेच येथील रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम प्रशंसनीय असल्याबाबत पथकाने समाधान व्यक्त केले. रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती लाभशेटवार यांनी जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेली कामे तसेच अमृत सरोवर अभियानांतर्गत होत असलेल्या कामांबाबत माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये