मुंबई : जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर सावधान ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्रामच्या माध्यमातून बिटकॉइन संदर्भात मेसेज पाठवून फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. पाठवलेल्या मेसेजची लिंक ओपन करताच संबंधित हायकरकडून आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. मुलींचेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सायबर गुन्हेगार इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्या अगोदर तुम्हाला एक मेसेज पाठवतात ज्यात म्हटले असते की, तुमचा अकाउंट हॅक करण्यात आलेला आहे तुम्हाला दिलेल्या लिंक वर क्लिक करा. इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्यानंतर सायबर गुन्हेगार आपण दिलेल्या ई-मेल आयडी व पासवर्ड बदलून टाकतो व आपल्या अकाउंटद्वारे आपल्या परिचयातील लोकांना मेसेज पाठवतो आणि त्यांना देखील पासवर्ड बदलण्यास सांगतो, अशा पद्धतीने इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना घडताना दिसत आहेत.
याप्रकरणी सायबर सेलेकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी इंस्टाग्राम अकाउंट वापरताना आलेल्या कोणत्याही मेसेज वर क्लिक न करता त्याची शहानिशा करावी, ज्या व्यक्तीकडून हा मेसेज आला आहे त्या व्यक्तीला फोन करून त्या मेसेजची पुष्टी करावी. तसेच एखाद्या तज्ञकडून आपले अकाउंट सिक्युअर करून घ्यावे.