सामन्यापूर्वीच मुंबईला झटका! गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावला; खेळणार का नाही प्रश्नचिन्ह..

मुंबई : (IPL 2023 Arjun Tendulkar Mumbai Indians) लखनौ आणि मुंबई यांच्यात इकाना स्टेडिअमवर आज सामना रंगणार आहे. प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी हा सामना निर्णायक आहे. पण या सामन्यापूर्वी अर्जुन तेंडुलकरबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावल्याचे समोर आलेय. अर्जुन तेंडुलकर याने स्वत: ही माहिती दिली. लखनौ सुपर जायंट्सने हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये अर्जुन तेंडुलकर त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगतोय.
लखनौ सुपरजायंट्सने ट्वीटर खात्यावरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, अर्जुन स्वत:च कुत्रा चावल्याची माहिती देत आहे. अर्जुन आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटला. युद्धवीर आणि मोहसिन खान यांना अर्जुन भेटला. त्यावेळी त्यांना अरे कुत्रा चावला.. अशी माहिती युद्धवीरला दिली. तो म्हणाला की, ‘अरे माझ्या हाताच्या बोटाला कुत्रा चावलाय.’ त्याशिवाय तो हाताची जखमही दाखवत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
दरम्यान, दोन वर्ष बेंचवर बसल्यानंतर यंदा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. अर्जुन तेंडुलकर याने चार सामन्यात तीन विकेट घेतल्या. गेल्या काही सामन्यापासून अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नाहीये. मुंबईला आज लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळाणार आहे. प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने हा सामना मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात अर्जुनला संधी मिळणार का ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.