काँटे की टक्कर! घरच्या मैदानावर लखनौसमोर तगड्या मुंबईचं आव्हान; कोणाचं पारडं जड? वाचा सविस्तर..

लखनऊ : (IPL 2023 LSG vs MI) आयपीएल 2023 चा 16 वा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे यापुढे होणारे सर्व सामने हे रोमंचक असणारा आहेत. त्यातच आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. काल गुजरात विरुद्ध हैदराबादच्या सामन्यात गुजरात संघानं विजय मिळवत प्लेऑफचं तिकीट मिळवलं. आजच्या सामन्यात लखनौ आणि मुंबई यांच्यातील प्लेऑफमध्ये कोण धडक देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघ पॉईंट टेबलमध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत, पण आजचा सामना बरंच काही बदलू शकणार आहे.
आजचा सामना लखनौ सुपर जायंट्सचं होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर होणार आहे. लखनौचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 सामने गमावले आहेत, 1 सामना अनिर्णित राहिला आहे, ज्यामुळे त्यांचे 13 गुण आहेत. आणि लखनौच्या वर म्हणजे, मुंबई इंडियन्स आहे, ज्यांनी 12 सामन्यांत 7 सामने जिंकले आहेत, 5 सामने गमावले आहेत आणि 14 गुण आहेत. त्यामुळे मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. जर लखनौनं मुंबईला पराभूत केलं तर त्यांचे 15 गुण होतील आणि ते तिसऱ्या क्रमांकावर येतील. पण जर मुंबई जिंकली तर त्यांचे 16 गुण होतील आणि ते चेन्नईला तिसर्या स्थानावर नेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल.
लखनौच्या एकना स्टेडियमवर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत फक्त मुंबईतच सामने झाले आहेत. अशा स्थितीत आज लखनौला घरच्या मैदानाचा फायदा घेता येईल. लखनौनं आजचा सामना गमावला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्याचवेळी सामना गमावल्यानंतरही मुंबईला संधी असेल. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, टिम डेविड, कॅमरून ग्रीन, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडोर्फ, कुमार कार्तिकेय.
लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कायल मेयर्स, क्रुणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टोयनिस, आयुष बदोनी, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवि बिश्नोई, युद्धवीर सिंह चरक.