क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

धोनीनं नाणेफेक जिंकली, सामना रोहित जिंकणार? चेन्नईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

मुंबई : (IPL 2023 MI Vs CSK) आज मुंबई आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन वर्षानंतर मुंबई आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा सामना होय. दोन्ही संगामध्ये काटें की टक्कर पाहायला मिळते. चेन्नईविरोधात रोहित शर्माने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा याने वानखेडे स्टेडिमवर खेळताना चेन्नईविरोधात 40 च्या सरासरीने आणि 135 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला होता. आज रोहित शर्मा चेन्नईविरोधात मोठी खेळी करत मुंबईला आयपीएल 16 च्या हंगमातील पहिला विजय मिळवून देणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.

दोन वर्षानंतर मुंबई आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यातच आघाडीचा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. आज अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण करणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये