क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

MI Vs CSK : धोनी-रोहितमध्ये रंगणार महामुकाबला! मुंबईला विजयाचा सुर मिळणार?

मुंबई : (IPL 2023 MI vs CSK) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या या मोसमात, आजपासून पुन्हा दुहेरी हेडर सामने (IPL Double Header) म्हणजे दोन सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल 2023 मधील दुहेरी हेडरमधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात रंगणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मानले जातात. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2023 मध्ये आज धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ तिसरा सामना तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ दुसरा सामना खेळणार आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात. याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक 5 वेळा आणि चेन्नईने 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. खेळाडूंसोबतच चाहतेही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

यंदाच्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्सचा हा तिसरा सामना असेल. चेन्नई संघाने एक सामना जिंकला असून एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव केला.

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या मोसमातील हा दुसरा सामना असेल. अद्याप मुंबई संघाला खातं उघडता आलेलं नाही. मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 मधील पहिल्या विजय शोधात आहेत. पहिल्या सामन्यात मुंबईचा बंगळुरूकडून पराभव झाला होता. या सामन्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन हे बंगळुरूच्या खेळपट्टीवर फ्लॉप ठरले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये