अवघ्या 59 धावांवर राजस्थानची बंगळुरूसमोर शरणागती! निम्मा संघ शुन्यावर बाद..

रायपूर : (IPL 2023 RR Vs RCB) बंगळुरू संघाने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर जोडी यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांना भोपळाही फोडता आला नाही. दोन्ही दिग्गज फलंदाज एकापाठोपाट बाद झाल्यानंतर राजस्थानची निम्यापेक्षा जास्त टिम ढसळली.
पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने फार्मात असलेल्या यशस्वी जैस्वालला शुन्यावर बाद करत, पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिल्या ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 1 बाद 5 धावा झाल्या आहेत.
यशस्वी जैस्वाल पाठोपाठ राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका वेन पार्नेलने दिला. जोस बटलरला शुन्यावर आऊट केलं. त्यामुळे 1.2 ओव्हर्समध्ये राजस्थानची आवस्था 2 बाद 6 धावा अशी झाली होती.
आधी यशस्वी जैस्वाल, त्यानंतर जोस बटलर आणि त्यानंतर कॅप्टन संजू सॅमसन बाद झाला. पार्नेलच्या बॉलिंगवर सॅमसनची विकेटकीपर अनुज रावतने कॅच घेतली. संजूने 5 चेंडूत 4 धावा करताना एक चौकार लगावला. राजस्थानने 2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्या आहेत. 2 ओव्हर अखेरीस राजस्थानच्या 3 बाद 11 धावा अशी स्थिती झाली होती. राजस्थानचा जवळपास निम्मा संघ शुन्यावर बाद झाला. त्यामुळे 10.3 षटकांत अवघ्या 59 धावांवर संपूर्ण संघाने शरणागती पत्कारली.