क्रीडा

बाबो! आयपीएलची फायनल मॅच आधीच होती फिक्स?, वाचा सविस्तर!

मुंबई | आयपीएल 2022 च्या (IPL 2022) अंतिम सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा 7 विकेट्सने पराभव केला. पहिल्याच सीझनमध्ये विजेतेपदावर आलपं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उपस्थित होते. मात्र काल झालेला अंतिम सामन्यामध्ये फिक्सिंग (IPL 2022 Final Match Fix) झाल्याचं बोललं जात आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव झाल्याने चाहतेही नाराज झाले आहेत. त्यांनी थेट राजस्थान रॉयल्स संघावर फिक्सिंगचा (IPL 2022 Final Match Fix) आरोप केला आहे. नाणेफेक जिंकल्यावर संजू सॅमसनने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णयही चाहत्यांना पटला नाही. सोशल मीडियावर फिक्सिंग असा ट्रेंड झाला आहे.

युजरने पिंक आर्मीला नाणेफेकीच्या निर्णयावरून धारेवर धरलं आहे. याआधीच्या दोन सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल होता. मात्र अंतिम सामन्यामध्ये आधी फलंदाजीचा निर्णय घेतल्यामुळे फिक्सिंगचा आरोप केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये