चिंताजनक! भारत-आयर्लंड सामन्यावर पाणी फिरणार? बुमराहला अॅक्शनमध्ये पाहण्यासाठी ‘वेट अॅन्ड वाॅच’
Ireland Vs India 1st T20 Weather Report : भारतीय क्रिकेट संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्याची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7ः30 वाजता खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. कारण दुखापतीमुळे जवळपास वर्षभर मैदानाबाहेर राहिल्याला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची मैदानावर एन्ट्री होणार आहे.
दरम्यान, पावसाचा अंदाज दर्शविला जात असल्यामुळे बुमराहच्या अॅक्शन इंट्री पाहाण्यासाठी अतूर झालेल्या भारतीय क्रिकेटप्रेमींना आणखी वाट पाहावी लागणार तर नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. या मालिकेत त्याच्यावर गोलंदाजीसह टीम इंडियाचा कर्णधार म्हणून दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. आयर्लंडचा संघ घरच्या मैदानावर खेळत असून त्याला कमी लेखता येणार नाही.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाऊस पाणी फिरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. द व्हिलेज स्टेडियमच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो. या मैदानावर भारतीय संघाने तीन वेळा 200हून अधिक धावा केल्या आहेत. येथे सर्वात मोठी धावसंख्या 252 धावांची आहे. यामुळे चाहत्यांना हाय स्कोअरिंग मॅच बघायला मिळू शकते.
भारतासोबतच आयर्लंड संघात अनेक स्फोटक फलंदाज आहेत. या मैदानावर आतापर्यंत 16 सामने झाले आहेत. ज्यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 9 वेळा विजय मिळवला आहे. पण भारताने प्रथम फलंदाजी करताना तीन वेळा विजय मिळवला आहे. मात्र, गेल्या वर्षी येथे भारताच्या 225 धावांना प्रत्युत्तर देताना आयर्लंडने 221 धावा केल्या होत्या. त्यामुळे आयर्लंडला हालक्यात घेणे टीम इंडियासाठी महागात पडणार आहे.