ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
सोमय्यांचा व्हायरल व्हिडीओ खरा?
मुंबई | Kirit Somaiya – भाजप नेते खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा व्हायरल व्हिडीओ मॉर्फ नसून खरा असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी बुधवारी केला. तपास पथकाने सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओचे विश्लेषण केले. त्यात तो व्हिडीओ खरा असल्याचे निष्पन्न झाले.
आता पोलीस हा व्हिडीओ लिक करणाऱ्याचा शोध घेत आहेत, असे समोर आले आहे. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या ऐन तोंडावर लिक झाला होता.