नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारे जे4ई चे इव्हेंट; गुरुवारी मोरे सभागृहात उद्योजकांचा महाकुंभ

पुणे : सुमारे ५० हून अधिक कॉर्पोरेट उद्योजकांना भेटण्याच्या संधीसह बिजनेस नेटवर्क करण्याची अपूर्व संधी घेऊन आलेला जे फोर इ शिक्षा एज्युकेशन सोसायटी यांच्या माध्यमातून होणारा पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये पार पडत आहे.
यानिमित्ताने आर एम के इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रमुख रामदास काकडे हे उपस्थित राहणार असून यामध्ये लघुउद्योजकांना बिजनेस नेटवर्किंग करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. देशातील शहरातील अनेक निमित्ताने वेगवेगळ्या मान्यवर या निमित्ताने उपस्थित राहत आहेत. सुमारे ७०० ते १००० सदस्यांनाअंतर व्यवसाय संधीसाठी संवाद साधण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. हा समारंभ गुरुवार दिनांक १८ मे रोजी सकाळी तीन पासून ते रात्री नऊ पर्यंत चालणार आहे.
तर यावेळी सायंकाळी सहा वाजता वाजता ओपन नेटवर्किंग रजिस्ट्रेशन कार्यक्रम होणार. संध्याकाळी सहा ते नऊ मध्ये जे फोर ई अवॉर्ड कार्यक्रम होणार असून त्यामध्ये पन्नासहून अधिक उद्योजकांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम घेत असल्याची प्रतिक्रिया जे फॉर ई चे संस्थापक विशाल मेठी यांनी राष्ट्रसंचारशी बोलताना दिली.या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये नवनाथ येवले, सचिन भोसले, किशोर सरपोतदार, महेंद्र पवार, श्रीकृष्ण सावंत, प्रदीप तुपे, वैभव देशमुख, रघुनाथ चित्रे पाटील, पल्लवी वागस्कर, शैलेश भोर, अक्षय मुंधे, दादासाहेब उर्हे, सचिन सानप, अरुण रामामूर्ती, नेहा माथूर, पराग पुल्लिवर उपस्थित राहणार आहेत.