ममतादीदींशी पंगा घेणाऱ्या राज्यपालांना मिळाली उपराष्ट्रपतीपदाची बक्षीस?

नवी दिल्ली : (Jagdish Dhankad’s candidacy for Vice President) शनिवार दि. १६ रोजी झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. बैठकीनंतर उपराष्ट्रपतीपदासाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या वतीने पश्चिम बंगालचे बहुचर्चित राज्यपाल जगदीप धनकड हे उमेदवार असतील, अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतींकडे राज्यसभेच्या संचालनाची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसने गेल्या काही काळात केलेल्या गदारोळात या पार्श्वभूमीवर धनकड यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी असताना वेळोवेळी घेतलेल्या भूमिका हीच बाब पंतप्रधानांनी भाजप उमेदवार ठरविताना लक्षात घेतल्याचे स्पष्ट आहे.
जगदीप धनकड हे मूळचे राजस्थानातील आहेत. जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेथे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकार बद्दल वेळोवेळी घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरल्या आहेत. यामुळं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि धनकर यांचे संबंध पराकोटीचे ताणलेले राहिले. पश्चिम बंगाल मधील त्यांची कामगिरी पाहूनच त्यांना भाजपने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली हे स्पष्ट मानले जाते.