ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

जे. पी. नड्डा गुरुवारी पुण्यात! भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला करणार मार्गदर्शन

पुणे : (Jagdish Mulik On J. P. Nadda) भाजप प्रदेश कार्यकारिणीची येत्या गुरुवारी (18 मे) पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज पत्रकारांना दिली.

मुळीक म्हणाले, या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. बैठकीनंतर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत.

मुळीक म्हणाले, या बैठकीसाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत.

मुळीक पुढे म्हणाले, या बैठकीच्या निमित्ताने पुणे शहर भाजपच्या वतीने विविध व्यवस्थांचे नियोजन आणि वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीसाठी विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये