जहाल नक्षल महिलेने पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण; गडचिरोली पोलीस दलास मोठे यश
गडचिरोली | अकरा लाख रुपयांचे बक्षीस असलेली जहाल नक्षल महिलेनं आज (7 ऑक्टोबर) गडचिरोली पोलिसांपुढे (Gadchiroli Police) आत्मसमर्पण केले. रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी, (वय 28) असं आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलचे नाव आहे. रजनी उर्फ कलावती संमय्या वेलादी रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) येथील रहिवासी खून चकमक आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर 11 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. तर आतापर्यंत 586 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोतप्ल यांनी दिली आहे.
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत नक्षल्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचारांच्या जीवनाला कंटाळून त्यांनी आत्मसमर्पण केले. रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी ही ऑगस्ट 2009 ला फरसेगड दलममध्ये सदस्या पदावर भरती होऊन सन 2010 पर्यंत कार्यरत होती. त्यानंतर सन 2010 ला ओरच्छा दलममध्ये बदली होऊन सन 2013 पर्यंत कार्यरत होती. सन 2013 ला नॅशनल पार्क एरीया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम (एरीया कमीटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सन 2015 पर्यंत कार्यरत होती. सन 2015 ला सांड्रा दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत होती. 2019 ते 2013 या कालावधीत आतापर्यंत विविध गुन्ह्याची नोंद आहे.
ज्या नक्षलवाद्याना विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना लोकशाहीत सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.
आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.
– नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
– दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
– पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.
– खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
– चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
– नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
– शासनाने जाहिर केलेले बक्षीस.
– महाराष्ट्र शासनाने रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचेवर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
– छत्तीसगड सरकारने रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचेवर 05 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
– आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिला एकुण 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.