क्रीडादेश - विदेश

जेम्स अँडरसनने भारतीय गोलंदाजांना टाकले मागे

मुंबई : ट्रेंटब्रिज येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात अँडरसनने टॉम लॅथमला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍यांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय.

अँडरसनने आपल्या १७१ व्या कसोटी सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अँडरसनने भारताच्या दिग्गज गोलंदाजाला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. ट्रेंटब्रिज येथे इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना सुरू आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

कसोटीत पदार्पण : अँडरसनने २ मे २००३ रोजी लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. मुथय्या मुरलीधरन (८००) विकेटसह पहिल्या स्थानी, तर शेन वॉर्न (७०८) विकेट्ससह दुसर्‍या स्थानी आहे. अँडरसनची नजर दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला मागे टाकण्यावर असेल.

सर्वाधिक कसोटी बळी : अनिल कुंबळे (भारत १९९०-२००८) : १३२ सामने – ६१९ बळी

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये